आपला भारत देश प्रामुख्याने कृषि प्रधान देश आहे म्हणुन शेतीला अन्यन्य साधारण महत्व असून शेतीचे उत्पन्नावर देशाची प्रगती अवलंबून आहे. या देशातील जवळ जवळ 70% लोक शेती व्यवसाय करतात.त्यामुळे शेती व्यवसाय हा भारतीयांचा जिवनमार्ग व जिवणधारणा आहे.तर कृषि उत्पादन हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळेच म्हणतात शेतकरी सुखी तर देश सुखी
त्यातली त्यात आपला पारनेर तालुका हा नैसर्गिक पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने, दुष्काळ व लहरी हवामान कायम शेतकऱ्यांचे पाचवीला पुजलेले आहे.परंतु पारनेर तालुक्यातील शेतकरी हा प्रचंड कष्टकरी व येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीस तोंड देवुन पावसाच्या पाण्यावर प्रचंड कष्ट करुन आपला शेतमाल पिकवतो.त्यामध्ये कांदा हा शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नाचे महत्वाचे साधन बनलेला आहे. कांदा पिकाचे उत्पादनाबाबत पारनेर तालुक्याचे देशात नव्हे तर जगात नाव झालेले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळावी.त्यांचे शेतमालाचे आल्या बरोबर वजन व्हावे. विक्रीत व वजनात फसगत होवु नये. निरनिराळया कपाती पासुन संरक्षण व्हावे.शेतकऱ्यांचे शेतमालाची जाहीर लिलाव पध्दतीने विक्री करुन त्यांना शेतमालाचे हिशोब पट्टीची रक्कम खात्रीशीर मिळावी व या सर्व व्यवहारांवर नियंत्रण असावे या उद्देशाने सरकारने 1939 साली मुंबई प्रांता करीता स्वतंत्र कृषि उत्पन्न बाजार समिती कायदा असित्वात आला व त्यात सुधारणा होवुन महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चा कायदा अमलात येवुन त्या अन्वये 21 नोव्हेंबर 1981 साली अहमदनगर बाजार समिती मधुन विभाजन होवुन कृषि उत्पन्न बाजार समिती पारनेरची स्थापना करण्यात आली व बाजार समितीच्या कामकाजास सुरुवात झाली सुरुवातीच्या काळात अतिशय नगन्य व कायमच ड वर्गात असणारी बाजार समितीचा खऱ्या अर्थाने सन 2000 साली मुख्य बाजार आवार पारनेर येथे कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु करुण कायापालट होण्यास सुरुवात झाली.त्यामुळे त्या काळचे संचालक मंडळ,सचिव व सर्वात महत्वाचे व्यापारी दिवंगत पाडुंशेठ काळे व सध्याचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.मारुतीशेठ रेपाळे यांचे योगदान आहे.तसेच तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय नेतृत्व व बाजार समितीच्या जडण घटणीमध्ये योगदाने देणारे सभापती,उपसभापती ,संचालक मंडळ यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवुन संस्थेच्या भरभराटीसाठी नेहमी प्रयत्न केलेले आहे. तसेच पारनेर तालुक्या बरोबरच शिरुर, श्रीगोंदा ,संगमनेर ,जुन्नर,नगर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी ही बाजार समितीवर विश्वास दाखविलेला आहे. त्याचे ही मनापासुन अभिनंदन करतो.
