उपबाजार

उपबाजार भाळवणी

उपबाजार भाळवणी येथे गट नं.५७२/२ मध्ये बाजार समितीची ०.८० आर जागा असुन त्याठिकाणी बाजार समितीने २३ व्यापारी गाळेचे बांधकाम केलेले आहे. परंतु व्यापारी यांचे अनास्थेमुळे ते गाळे बंद होते सदर ठिकाणी बाजार समितीने नविन व्यापारी यांना अनुज्ञप्ती देवुन शेतमाल खरेदी विक्री व्यवहार सुरु केलेला आहे. त्याकरीता सदर जागेचा पुढील ५ वर्षाचा विचार करुण विकास आराखडा (ले आऊट) तयार करुन तो मंजुरीसाठी मा.पणन संचालक साहेब महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठवुन त्यास मा.पणन संचालक साहेब यांची मंजुरी घेण्यात आलेली आहे. त्यानुसार तेथे भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार दैनंदिन सुरु करणेत आलेले आहेत. तसेच व्यापारी गाळ्यांसमोर ओपन शेड प्रस्तावीत आहे. पुढील काळात शासनाचे DMI योजनेतुन विविध विकास कामे करुण बाजार आवार विकसीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पेट्रोलपंप

बाजार समितीने उपबाजार भाळवमी येथील जागेमध्ये सन २००८/२००९ या आर्थिक वर्षात दि.१९/३/२००९ रोजी इंडियन ऑयल कागोरशन लि. या कंपनीचा पेट्रोलपंप सुरु केलेला असुन त्याठिकाणी भाळवणी परिसरातील अनेक शेतकरी, वाहन मालक, ट्रक,टेम्पो चालक,भाळवणी व आसपासच्या परीसरातील नागरीक संरथेचा पेट्रोलपंप असल्याने पेट्रोल व डिझेल खरेदी साठी येत असतात. सदर पंपासाठी सुरुवातीला घेतलेले कर्जाची वेळेवर परतफेड करुन सध्या गेल्या अनेक वर्षापासुन पंप भांडवलावर चालु आहे. बाजार समितीने त्याठिकाणी सोलर सिस्टीम बसविण्यात आलेली असुन त्यामाध्यमातुन मोठया प्रमाणात विज बिलाची बचत झालेली आहे. अहवाल वर्षात बाजार समितीने एकुण ४ लाख ६२ हजार लिटर पेट्रोल, ४४ हजार ५५० लिटर पॉवर पेट्रोल, ५ लाख ८२ हजार लिटर डिझेलची विक्री केलेली असुन त्या माध्यामातुन बाजार समितीची रु.१० कोटी ९३ लाख इतकी आर्थिक उलाढाल होवुन ३२ लाख ७० हजार इतका व्यापारी नफा झालेला आहे. तसेच तेथे दैनंदिन भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहारांतुन रु.१ लाख १९ हजार उत्पन्न झालेले आहे.

उपबाजार सुपा

सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट नं.सी-२१ मध्ये बाजार समितीची ६३ आर जागा असुन त्याठिकाणी बाजार समितीने राष्ट्रीय कृषि विकास योजने मधुन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांचे माध्यमातुन १००० मे.टन क्षमतेचे गोदाम व धान्यचाळणी यंत्राचे काम पुर्ण झालेले आहे. धान्य चाळणी यंत्र कार्यान्वीत करुन शेतकऱ्यांना त्यांचे कडधान्याची चाळणी (ग्रेडींग) करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची प्रतवारी नुसार बाजार भाव मिळण्यास मदत होणार आहे. तसेच १००० मे.टन गोदाम व धान्य चाळणी यंत्र भाडेतत्वावर देण्यात येवुन समितीचे उत्पन्नात वाढ करणेचा प्रयत्न करणार आहोत. तसेच तेथील जागेचा विकास आराखडा तयार करुन त्या प्रमाणे नियोजीत विकास कामे करण्याचा प्रयत्न आहे.

उपबाजार टाकळी ढोकेश्वर

उपबाजार टाकळी ढोकेश्वर येथे गट नं.१६४ मध्ये बाजार समितीची २ एकर ३० गुंठे जागा असुन सध्या ती विना वापर पडुन आहे.